Monday, 21 November 2016

Vidhan parishad Bhandara-Gondia 2016


विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप चे डॉ. परिणय फुके विजयी झाले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधुन घेतलेल्या भंडारा-गोंदिया या मतदारसंघात भाजप पक्षाने विजय मिळवला. हा मतदारसंघ पहिले काँगेस व नंतर राष्टवादी कडे होता. या बालेकिल्ल्यात भाजप चे परिणय फुके यांनी दोन टर्म पासून आमदार असलेले राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांचा पराभव केला.

या निवडणुकीत त्यांच्या विरोधात कांग्रेस कडून प्रफुल अग्रवाल तर राष्ट्रवादी कडून राजेंद्र जैन यांच्यासह पाच अपक्ष उमेदवार रिंगनात होते. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत १०० टक्के मतदान करून मतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

दि. १९/११/२०१६ शनिवारला ही निवडणुक एकूण चार मतदान केंद्रावर अगदी शांततेत पार पडली. मतमोजणी दि. २२/११/२०१६ मंगळवार ला निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला यात भाजप पक्षाचे परिणय फुके यांचा एकूण ८२ मतांनी विजय झाला.

नाना पटोले ठरले विजयाचे शिल्पकार
विधान परिषदेच्या या निवडणुकीत उमेदवार शोधन्यापासून तर विजयाची व्युहरचनाआखन्यापर्यंत खासदार नाना पटोले यांची भूमिका 'किंगमेकर' ची राहिली. या निवडणुकीत मराठी मानुस निवडून यावा यासाठी त्यांनी स्वपक्षासह अन्य पक्षातील मतदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यासाठी संवाद साधत राहिले.

Further readings on the topic of Election:

Click here To know Candidates (for Mayor) in Bhandara Municipal corporation election 2016
Click here To know Bhandara Nagar Parishad Election 2016 Schedule
Click here To know Vidhan parishad Bhandara-Gondia 2016
Click here To know 7 Tehsils or Talukas in Bhandara district
Click here To know Mayors list of Bhandara Municipal Corporation
Click here To know Candidates List - Bhandara Nagar Parishad Election 2016
Click here To know Nagar Parishad Bhandara (Total Body)
Click here To watch video on Result of Nagar Parishad Bhandara

No comments:

Post a Comment